Share

राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर नील सोमय्यांची अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्याबाबत मोठा खुलासा केला होता. नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार असून या प्रकल्पासाठी सोमय्यांनी ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी केला होता. आता नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांनी लावलेले आरोप फेटाळले होते, मात्र दुसरीकडे नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावरच आज सुनावणी होणार आहे. मात्र राऊतांचे आरोप आणि सोमय्यांनी ते आरोप फेटाळून लावणे, त्यात नील यांची याचिका करणे या सर्व घटनांचे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान ४०० कोटींना मारा गोळी, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प अगदीच छोटा असून त्यामध्ये पीएमसी बँकेतील एक पैसाही आलेला नाही. आम्ही दमडीचीही चूक केलेली नाही. आम्ही गैरव्यवहार केल्याचे पुरावे असतील तर ठाकरे सरकारने आमच्या विरोधात चौकशी करावी असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले होते. त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा वर आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!