Share

‘फडणवीस मुख्यमंत्री असताना का अटक केली नाही?’; नवाब मलिक अटक प्रकरणी हसन मुश्रीफांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. तसेच भाजप नेत्यांनी देखील नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी भाजप आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.महाविकासआघाडी ला बदनाम करण्याचे षड्यंत्र असून याचा एकत्रितपणे मुकाबला केला जाईल असा इशारा यावेळी आला.

या कारवायांवरुन सोशल मीडियावर देखील महाविकास आघाडी आणि आघाडीच्या नेत्यांना बदनाम केले जाते. यापुढे त्यांनाही जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिला. मंत्री मलिक यांचे दाऊदशी संबंध होते तर मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी कारवाई का केली नाही, असा सवाल मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!