Share

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल अडकला लग्नबंधनात…

Published On: 

नवी दिल्ली : फिरकीपटू युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात होता. तर यावेळी. ऑस्ट्रेलियात भारताला ट्वेन्टी-20 मालिका जिंकवून देण्यात चहलचे महत्त्वाचे योगदान होते.

मात्र त्यांनतर चहल कसोटी मालिकेपूर्वी तो भारतात परतला होता. आता चहलने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी दिली आहे. ती म्हणजे भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात अडकला आहे. कोरिओग्राफर आणि यूट्यूबर धनश्री वर्मासोबत त्याने लग्न केले आहे. या गोड बातमीमुळे त्याच्या चाहते त्याच्या वर आनंद व्यक्त करत त्याच्या वर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

https://twitter.com/yuzi_chahal/status/1341400611829506048

फिरकीपटू युजवेंद्र चहलने याने काही दिवसांपूर्वी त्याची मैत्रीण धनश्री वर्माशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा साखरपुडा सोहळाही पार पडला होता. चहलची जोडीदार धनश्री वर्मा मुंबईची रहिवासी आहे. चहल आणि धनश्री मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नेहमीच अपलोड करत आले आहेत. या दोघांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून लाखोंनी लाईक्स मिळतात.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. बुधवारी त्यांचे लग्न झाले.

तर धनाश्रीपुर्वी कन्नड सिने अभिनेत्री तनिष्का कपूर सोबत अनेक कार्यक्रमांमध्ये यजुवेंद्र चहल दिसून आला होता. यामुळे यजुवेंद्र चहल कन्नड सिने अभिनेत्री तनिष्का कपूरला डेट करत असल्याच्या वृत्त पसरले होते. परंतु यजुवेंद्र चहल याने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे सांगून त्याने लग्नाच्या बातम्यावर पडदा टाकला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!