Share

पंतप्रधान मोदीजींच्या आशीर्वादाने भारतीय भगिनी धुरमुक्त जीवन जगण्याचा आनंद  घेत आहेत-रावसाहेब दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:पूर्वी ज्याच्याकडे गॅस होता ते श्रीमंत समजले जायचे परंतु पंतप्रधान मोदींजींच्या(Prime Minister Modi) आशीर्वादाने आता प्रत्येक घरात उज्वल योजनेच्या माध्यमातून गॅस पोहचला आहे़. त्यामुळे धुरमुक्त जीवन जगण्याचा आनंद भारतीय भगिनी घेत आहेत. केंद्रीय योजनेतून कोविडच्या काळात मोफत धान्य सर्वांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केंद्र सरकारच्या माध्यमातून झाल्याचे प्रत्येकाने पाहिले असून जेव्हा लस उपलब्ध होतच नव्हती तेव्हा मोफत लस देण्याचे कार्य एकमेव भारत सरकारच्या वतीने देशात सुरू होते. असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी घाटनांद्रा येथे केले.

कोरोना संसर्ग आजारात जागतिक स्थरावर भारताचे नाव मोढ्या अभिमानाने उंचावले गेले आहे. घराणेशाही असणार्‍यांनी गरिबी तर संपवली नाहीच परंतु जन आशीर्वादाने पंतप्रधानच गरिबांचा झाला. मानवता हित जोपासत भारतातील नागरिकांबरोबर इतर गरजू देशातील नागरिकांना लस पुरवली. असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे यांनी घाटनांद्रा जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

तालुक्यातील घाटनांद्रा जिल्हा परिषद सदस्य शिल्पा गरूड यांच्या जिप विकास निधीतून विविध गावात विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यामध्ये तळणी गावांअंतर्गत सिमेंट रस्ता, ड्रेनेज लाईन, पुलाचे बांधकाम करणे, कोटनांद्रा रस्त्याचे मजबूती व डांबरीकरण, अंगणवाडी बांधकाम, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवणे, देऊळगाव बाजार रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे आदी कामांचे लोकार्पण झाले. यावेळी माजी आमदार साडू पाटील, सुरेश बनकर, पुष्पा काळे, इद्रिस मुलतानी आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!