🕒 1 min read
मुंबई: T20I क्रिकेटमधील संघांच्या नामांकित यादीमध्ये भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत सामील होण्याच्या मार्गावर आहे.टी २० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९९ विजयांसह, भारत या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघांच्या यादीत फक्त पाकिस्तानच्या मागे आहे. आतापर्यंत १८९ टी-२० सामने खेळलेल्या पाकिस्तानने टी-२० मध्ये ११७ सामने जिंकले आहेत. यात सुपर ओव्हर किंवा टायब्रेकरच्या इतर प्रकारातील विजयांचा समावेश नाही.
दुसरीकडे, भारताने आतापर्यंत खेळलेल्या एकूण १५७ सामन्यांपैकी ९९ सामने जिंकले आहेत. अशा प्रकारे, पाकिस्तानच्या तुलनेत विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत भारताचा यशाचा दर जास्त आहे. आज (२६ फेब्रुवारी) रोजी धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यासह, भारताला पाकिस्तान सोबत १०० किंवा त्याहून अधिक टी-२० जिंकणारा दुसरा संघ बनण्याची संधी आहे. या यादीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ आहेत.
जर भारतीय संघ आज जिंकला तर तो न्यूझीलँडसह घरच्या मैदानावर सामान (३९) सामने जिंकण्याची बरोबरी करेल. शिवाय, जर भारताने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा T20 सामना जिंकला तर भारताचा हा त्यांच्याविरुद्धचा १६ वा विजय असेल. झिम्बाब्वे विरुद्ध १६ विजयांसह भारताने पाकिस्तानसह T20I मध्ये कोणत्याही विरोधी संघाविरुद्ध संयुक्तपणे सर्वाधिक विजय मिळवले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६२ धावांनी आरामात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…तर तुम्ही कपाळ करंटे”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
- राष्ट्रवादी नेत्याकडून अमृता फडणवीसांचा आक्षेपार्ह उल्लेख; भाजपचा इशारा
- IPL 2022: आयपीएलचे संघ दोन गटात वाटले जाणार ; वाचा कोणता संघ कोणत्या गटात
- “महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका…”, ईडीच्या धाडींवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- युक्रेन-रशिया युद्धात चीनची उडी; शी जिनपिंग पुतीन यांना फोन करत म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
