Share

‘मर्यादित षटकांमध्ये भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार बनवल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरने या निर्णयाचे खूप कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की भारतीय क्रिकेटसाठी आता दोन वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार आहेत.

विराट कोहलीची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्याच्या जागी रोहित शर्माची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोहलीने याआधीच टी-20 चे कर्णधारपद सोडले होते आणि आता त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले असून रोहित शर्मा आता टी-20 तसेच वनडेच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

मर्यादित षटकांमध्ये भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात – गौतम गंभीर

एका वृत्तसंस्थेच्या संभाषणादरम्यान, गौतम गंभीरने रोहित शर्माच्या ODI आणि T20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “माझ्या मते, हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे की आता आम्हाला दोन कर्णधार मिळाले आहेत. एक खेळाडू मर्यादित षटकांचा कर्णधार आहे आणि दुसरा खेळाडू कसोटी फॉरमॅटचा कर्णधार आहे. रोहित शर्माला भरपूर वेळ मिळेल. मला वाटते की रोहित शर्मा भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच चांगली कामगिरी करेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ आता अतिशय सुरक्षित हातात आहे. अस गंभीरने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!