Share

‘रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : महान फलंदाज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रोहित शर्माला एक महान कर्णधार म्हणून संबोधले आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवताना तो भरपूर यश मिळवेल असेही म्हटले आहे.

रोहित शर्माला नुकतेच भारताच्या T20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय त्याला कसोटी संघाचा उपकर्णधारही करण्यात आले आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे आणि त्याला भारतीय संघातही अशीच कामगिरी करायला आवडेल.

एका वृत्त वाहिनीशी संवाद साधत असताना सौरव गांगुलीने आयपीएलचे उदाहरण दिले आणि रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार असल्याचे वर्णन केले आहे.ते म्हणाले, रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे आणि तेव्हाच निवडकर्त्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. तो संघाला नक्कीच नव्या उंचीवर नेईल. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने पाच विजेतेपद पटकावले आहे.

काही वर्षांपूर्वी त्याने आशिया चषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व करत विजय मिळवून दिला होता, तर विराट कोहलीही त्या संघात नव्हता. विराट कोहलीशिवाय संघ जिंकला आणि यावरून संघ किती मजबूत आहे हे दिसून येते. रोहित शर्माने मोठ्या स्पर्धांमध्ये यशाची चव चाखली आहे. त्याच्याकडे चांगला संघ आहे आणि आशा आहे की भारतीय संघ भरपूर यश मिळवेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!