Share

भारतीय सैन्याकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Published On: 

श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासुन जम्मु- काश्मिर आणि पाकिस्थान दरम्यानच्या भागात पाक पुरस्कृत दहशत वाद्यांच्या हालचाली वाढल्याने भारतीय लष्कराने या परिसरावर करडी नजर ठेवली आहे. गेल्या काही आठवड्यात दशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय ९ जवान शहीद झाले होते. याच जम्मुच्या सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे.

भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु आहे. राजौरी सेक्टमधील चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरु असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी या कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दहशतवादी स्वत:च बाहेर येऊन हल्ल्याचा प्रयत्न करतील तेव्हा उत्तर द्यावे असा सल्ला स्थानिक कमांडर्सला देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणाऱ्या जंगलामधून श्रीनगरमध्ये लष्कर ए तोयबाच्या ९ ते १० दहशतवाद्यांनी भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केली. यापैकी अनेकांचा मुख्य नियंत्रण रेषेजवळच खात्मा करण्यात आला. अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर पाकिस्तानी दहशतवादी कारवायांना जोर आला आहे. याच दरम्यान सैन्याला मोठं यश मिळालं आहे. मंगळवारी जवानांनी पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!