टीम महाराष्ट्र देशा- अमेरिकेने दिलेले सल्ले आणि सूचनांनंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही. यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेने अखेर पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली आहे. बुधवारी ड्रोन्सच्या माध्यमातून अमेरिकेने हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यात एका कमांडरसह तीन जण ठार झाले आहेत. रॉयटर्सच्या हवाल्याने एनएनआयने हे वृत्त दिले आहे.
अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हांगु जिल्ह्यात ड्रोनद्वारे हल्ला केला. उत्तर वझिरीस्तानातील या हल्ल्यात हक्कानी संघटनेचा म्होरक्या एहसानसह आणखी दोघांना ठार मारण्यात आलं. अफगाण शरणार्थींशी संबंधित एका घराला टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला होता.
Two Commanders of terror group Haqqani network have been killed in a suspected US drone strike in FATA area of Pakistan: Reuters
— ANI (@ANI) January 24, 2018
वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. दहशतवादविरोधी कारवाई कडक करण्यास अमेरिकेने पाकला बजावलं होतं. मात्र कुठलीही कारवाई न केल्यामुळे वॉशिंग्टनहून पाकिस्तानला होणारी लष्करी आणि आर्थिक मदत रोखली होती.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका हॉटेलवर रविवारी तालिबानी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने कडक पावलं उचलली. पाकिस्तानच्या क्षेत्रात लपलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना अटक करा किंवा देशातून बाहेर काढा, अशी चेतावनी अमेरिकेने दिली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

