Share

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताचा ७ गडी राखुन विजय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत ५० षटकात श्रीलंकेने ९ गडी गमावत २६२ धावांची मजल मारली. श्रीलंकेकडून चमीका करुणारत्नेने ३५ चेंडुत १ चौकार आणि २ षटकारासह सर्वाधीक ४३ धावांची नाबाद खेळी केली. तर भारताकडून दिपक चहर, कुलदीप यादव आणि युजवेद्रं चहलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३७व्या षटकात ३ गडी गमावत हे अव्हान सहज पार केले. यासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली. भारताकडून कर्णधार शिखर धवनने ९५ चेंडुत ६ चौकार आणि १ षटकारांसह ८६ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. श्रीलंकेकडून धनंजया डीसिल्वाने सर्वाधीक २ गडी बाद केले. २४ चेंडुत ९ चौकारासह ४३ धावांची खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!