पुणे : पुणे शहरात आज नव्याने ३६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८३ हजार ८८४ इतकी झाली आहे. शहरातील ३३१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७२ हजार २४० झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ०५८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २७ लाख ८५ हजार ७३२ इतकी झाली आहे.
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ९५४ रुग्णांपैकी २३६ रुग्ण गंभीर तर ४८५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ६९० इतकी झाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे. दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती बाधित होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या दोषींविरुध्द कठोर कारवाई करा ; दरेकरांची मागणी
- चेंबूर दुर्घटना; ‘मृतांच्या कुटुंबीयांना मनपाने दहा लाखांची मदत द्यावी’, आठवलेंची मागणी
- भाजपाला शह देण्यासाठी मायावती सक्रिय, ‘बसपा’ अयोध्येत ब्राह्मण संमेलन भरवणार
- ‘उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा!’ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे धक्कादायक वक्तव्य
- ‘पटोलेंच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

