कोलकाता: एकतर्फी झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या टी -२० सामन्यात भारताने (India)न्यूझीलंडचा ७३ धावांनी धुव्वा उडवत तीन टी -२० सामन्यांच्या मालिकेवर ३-० असा विजय मिळविला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १८४ धावा उभारल्यानंतर न्यूझीलंडला १७.२ षटकांत १११ धावांत गुंडाळले. न्यूझीलंडकडून (New Zealand)सलामीवीर मार्टिन गुप्टिलचा अपवाद वगळता कोणीही छाप पाडू शकला नाही. गुप्टिलने ३६ चेंडूंत ४ चौकार व ४ षट्कारांसह ५१ धावांची एकाकी लढत दिली.
दरम्यान फिरकीपटू अक्षर पटेलने(Akshar patel ) किवींच्या फलंदाजीला सुरुंग लावत ३ षटकांत केवळ ९ धावांमध्ये 3 फलंदाज बाद केले. १४ व्या षटकांत किवींची ७ बाद ८४ धावा अशी अवस्था करत भारताने सामन्याचे चित्र स्पष्ट केले होते . न्यूझीलंडचे तब्बल ७ फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले. तत्पूर्वी, रोहित शर्माने (Rohit sharma)आपले आवडते ईडन गार्डन्स स्टेडियम गाजवले. त्याने ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षट्कारांचा तडाखा देत ५६ धावांची शानदार खेळी करत भारताच्या आव्हानात्मक धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. तर युवा फलंदाज इशान किशनसोबत ६ ९ धावांची सलामी देत रोहितने भारताला चांगली सुरुवात करून दिली.
दरम्यान रोहितने नैसर्गिक खेळ केला. किशननेही ६ चौकारांसह २१ धावांत २ ९ धावा कुटल्या. तर सूर्यकुमार ( 0 ) व ऋषभ पंत ( ४ ) अपयशी ठरले. तसेच रोहितही विक्रमी अर्धशतक झळकावून बाद झाल्याने १२ व्या षटकात भारताचा डाव ४ बाद १०३ असा घसरला. दरम्यान टिम साऊदीच्या अनुपस्थितीत किवी संघाचे नेतृत्व करणाऱ्या फिरकीपटू मिशेल सेंटनरने २७ धावांत किशन,सूर्यकुमार व पंत यांना बाद केले. तर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मायदेशात भारताने १२ पैकी ११ टी -२० सामने जिकले . मायदेशात रोहितच्या नेतृत्वात सलग पाचवा विजय. तर रोहित शर्मा मालिकावीर व अक्षर पटेल सामनावीर ठरला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; मुनगंटीवारांची टीका
- औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यात फूट; आतातरी संपावर निघणार का तोडगा?
- …तर साडेचारशे शेतकऱ्यांचे बळी गेले नसते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा मोदींना टोला!
- ‘इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना डासांप्रमाणे चप्पलेखाली चिरडलं अन्…’
- गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू; भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

