Share

औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यात फूट; आतातरी संपावर निघणार का तोडगा?

Published On: 

औरंगाबाद : एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण यांसह अनेक मागण्यांसाठी सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज १५ वा दिवस. त्यामुळे एसटी सुरु करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन कर्त्यांमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत मध्यवर्ती बसस्थानकातही जेष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये फुट पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे औरंगाबादेतही आंदोलक विखुरण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेले १५ दिवस एसटी बंद असल्याने सामान्य चाकरमानी बेहाल झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पैठण येथील आगारात कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याने शनिवारी पाचोड येथे एक बस सोडण्यात आली. मात्र बाहेर गेल्यानंतर काही अज्ञातांकडून या बसची तोडफोड झाली. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. मात्र अजूनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात महामंडळाला यश आलेले नाही. एसटी संपाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने एसटी प्रशासनाने निलंबनाचे हत्यार उपसले आहे.

आत्तापर्यंत मंडळाने कारवाईचा बडगा उगारत विभागातील ५४ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ५० च्या जवळपास रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस देण्यात आली आहे. दिवाळी सणाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. दिवाळी संपली असून परत आपल्या घराकडे परतणाऱ्या प्रवाशांचे या संपामुळे प्रचंड हाल होत आहे. मात्र आता राज्यात अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!