Share

कोरोना लसींचा 100 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु

Published On: 

नवी दिल्ली- देशात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या 100 कोटी मात्रा पूर्ण होण्याच्या दिशेनं वेगानं लसीकरण सुरु असून लवकरच हा टप्पा गाठला जाईल. देशात कालअखेर 89 कोटी 67 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी 65 कोटींहून अधिक पहिली मात्रा तर 24 कोटींहून अधिक दुसरी मात्रा म्हणून देण्यात आल्या आहेत. दिवसअखेर काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 62 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यातील मांजरी इथल्या लस निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी करणारा अर्ज भारत बायोटेक तर्फे पुण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर पुण्याजवळील मांजरी इथली वन विभागाच्या मालकीचा जागा कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सीन लसीच्या उत्पादनासाठी भारत बायोटेकला देण्यात आली असून लस निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी तिथं करण्यात आली आहे.

भारत बायोटेकच्या या प्रकल्पाला अन्न आणि औषध प्रशासनाची अंतिम मान्यता घेणे आवश्यक असून अनेकवेळा स्मरणपत्र पाठवल्यानंतर भारत बायोटेकतर्फे हा अर्ज सादर करण्यात आला आहे. सर्वप्रथम लस निर्मिती प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून लस निर्मितीसाठीचा अंतिम परवाना कंपनीला दिला जाईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं मांजरीच्या प्रकल्पात लस निर्मितीला प्रारंभ होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!