सिडनी: कोरोनामुळे जगातील सर्वात अर्थव्यवस्थांना खीळ बसली आहे. भारतामध्ये देखील कोरोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊन मुळे तसेच यंत्रणांवर आलेला ताण यामुळे शेती, व्यापार, उद्योग व्यवसायांवर दूरगामी प्रतिकूल परिणाम झाले आहेत. देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर टाकला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे .
आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.
आशिया पॅसिफिकमध्ये कोरोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. कोरोनामुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे.कोरोना विषाणूचा योग्यरीत्या हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे भारत आपली विकास क्षमता गमावून बसला असल्याचं देखील यामध्ये नमूद करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत; कॉंग्रेसची गुगली
- प्रकाशजीच असं बोलू शकतात, आंबेडकर नाही ; काकडेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- गब्बरची शतकी खेळी व्यर्थ, पंजाबच्या विजयामुळे इतर संघांची चिंता वाढली
- माझ्या लंडन जाण्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे – पी. व्ही. सिंधू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

