मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा एकमेव कसोटी सामना १६ जुन पासुन सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसाअखेर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने ६ गडी गमावत २६९ धावांची मजल मारली.
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील एकमेव कसोटीला १६ जुनपासुन सुरुवात झाली. या एकमेव सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीवीर लॉरेन हील आणि टॅमी ब्यूमॉन्ट यांनी ६९ धावांची अर्धशतकी सलामी दिली. हील ३५ धावांवर बाद झाली तरी टॅमी ब्युमॉन्टने खेळपट्टीवर टिकुन खेळत अर्धशतक झळकावले. टॅमीला कर्णधार हेदर नाइटने चांगली साथ लाभली.
टॅमी ६६ धावांवर बाद होताच कर्णधार नाइटने शानदार अर्धशतक झळकावले. नताली सायव्हर(४२) ने तिला चांगली साथ दिली. २३० वर ३ गडी बाद अशा स्थितीत असताना भारतीय गोलंदाज स्नेह राणा आणि दिप्ती शर्माने इंग्लंडच्या फलंदाजीला खिडांर पाडले. पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने ६ गडी गमावत २६९ धावा केल्या. या डावात इंग्लंडची कर्णधार हेदर नाइटने सर्वाधीक ९५ धावा केल्या तर भारताकडुन स्नेह राणाने सर्वाधिक ३ गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक फ्रान्सची टोटल एनर्जीज कंपनी करणार मराठवाड्यात गुंतवणूक!
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण

