मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा एकमेव कसोटी सामना १६ जुन पासुन सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसाअखेर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने ६ गडी गमावत २६९ धावांची मजल मारली.
मात्र हा कसोटी सामना सुरु होण्यापुर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक माफीनामा जाहीर केला आहे. कारण भारत आणि इंग्लंड महिला कसोटी सामन्यासाठी जी खेळपट्टी देण्यात आली ती वापरलेली होती. कारण याच मैदानावर मागील आठवड्यात शुक्रवारी ११ जुन रोजी ग्लोसेस्टरशायर आणि ससेक्स या दोन संघात एक टी-२० सामना याच खेळपट्टीवर खेळविण्यात आला होता. तीच खेळपट्टी भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील कसोटी सामन्यासाठी देण्यात आली.
#ENGvIND टेस्ट में ब्रिस्टल में जिस पिच का इस्तेमाल किया जाएगा, वहां इसी शुक्रवार को ग्लोसेस्टरशायर और ससेक्स के बीच में टी20 ब्लास्ट मुकाबला खेला गया था। pic.twitter.com/BKSzewVZjS
— ESPNcricinfo हिंदी (@CricinfoHindi) June 16, 2021
यावेळी दिलगीरी व्यक्त करताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हणले आहे की, ‘भारत आणि इंग्लंड दरम्यानचा हा सामना एप्रिल महिन्यात ठरविण्यात आला. आम्हाला खुप वाईट वाटत आहे की भारत आणि इंग्लंड संघादरम्यान कसोटी सामन्यासाठी जी खेळपट्टी देण्यात आली तिच्यावर ३७ षटके मागील आठवड्यात खेळवण्यात आली होती. इंग्लंड महिला क्रिकेट संघाला एक नवीकोरी खेळपट्टी भेटायला हवी होती. मात्र आम्ही माफी मागतो आम्ही चांगली खेळपट्टी पुरवु शकलो नाही’ अशा शब्दात इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलगीरी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारत-इंग्लंड महिला कसोटी सामना; पहिला दिवशी भारतीय गोलंदाजाचे वर्चस्व
- ‘…तर खूप पुढे जाईन ; म्हणून अंतिम सामन्यात खेळण्यास आतुर’
- …तर मोहम्मद सिराज असेल पर्याय ; वासिम जाफर यांची प्लेइंग 11
- साऊथम्पटनमध्ये स्लो बॉलर महत्त्वाचे ठरतील, पण…
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर

