Share

भारत-ऑस्ट्रेलिया संघात 3 दिवसीय सराव सामन्याला आज पासून सुरुवात

Published On: 

मुंबई : कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन संघात 3 दिवसीय सराव सामन्याला आज (6 डिसेंबर) सुरुवात झाली. या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ याला भोपळाही फोडला आता नाही. त्याचबरोबर त्याचा सहकारी सलामीवीर शुभमन गिलही खाते उघडण्यात अपयशी ठरला. 2.2 षटकानंतर भारताची धावसंख्या 2 बाद 6 धावा अशी झाली होती.

तिसऱ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने खेळपट्टीवर वेळ घेतला आणि हळू- हळू डाव पुढे नेला. दुसऱ्या टोकाला असलेला फलंदाज हनुमा विहारी यानेही त्याच्या खेळीची संयमी सुरुवात केली, मात्र त्यालाही अधिक काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याला वेगवान गोलंदाज जॅकसन बर्डने 15 धावांवर पायचीत केले.

टी20 मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत पहिला कसोटी सामना खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!