नवी दिल्ली : ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup) चा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढील वर्षी 6 मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. ही स्पर्धा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. यानंतर हॅमिल्टनमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमने सामने येणार आहे. 31 दिवसांत एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत.
जेतेपदासाठी 8 संघ मैदानात उतरणार आहेत. ICC नुसार, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत ICC महिला चॅम्पियनशिप 2017-2020 मधील त्यांच्या स्थानांच्या आधारावर या स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर न्यूझीलंड यजमान म्हणून पात्र ठरली. नुकत्याच झालेल्या पुरुषांच्या T20 विश्वचषकात भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच केली होती.
ICC महिला विश्वचषक 2022 लीग फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल, जिथे सर्व 8 संघ एकदा एकमेकांसमोर येतील. लीगमधील अव्वल 4 संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल. विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना ३० मार्च रोजी वेलिंगटन येथे खेळवला जाणार आहे.
दुसरा उपांत्य सामना 31 मार्च रोजी हेग्ले ओवलवर खेळवला जाईल. ICC महिला विश्वचषक 2022 च्या विजेतेपदाचा सामना 3 एप्रिल रोजी होणार आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवरायांचा अवमान करणारी ‘ही’ भाजपाची छिंदम प्रवृत्ती’, तात्काळ माफी मागा; कॉंग्रेसची मागणी
- ‘अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील पण…’
- घटस्फोटानंतर १६ वर्षांनी लहान असलेल्या अमृताशी बांधली गाठ; जाणून घ्या कोण आहे ‘तो’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला


