मुंबई: जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर, रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अंडर-१९ विश्वचषक विजेत्या कर्णधार यश धुलने दिल्लीसाठी पदार्पणातच शतक झळकावल्यामुळे भारताच्या प्रमुख प्रथम श्रेणी स्पर्धेची शानदार सुरुवात झाली, तर अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने सौराष्ट्रविरुद्ध मुंबईसाठी शतक खेळी केली आहे.मात्र या स्पर्धेत एका नवख्या खेळाडूने इतिहास रचला आहे. त्याने पहिल्याच सामन्यात त्रिशतक झळकावले आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये इतिहासाचा रचला गेला आहे. बिहारचा फलंदाज साकीबुल गनी याने कोलकाताच्या जादवपूर विद्यापीठ क्रिकेट मैदानावर मिझरोमविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे. गनीने अवघ्या ३८७ चेंडूंत हा टप्पा गाठला. गनी हा त्याच्या प्रथम श्रेणी पदार्पणात तिहेरी शतक झळकावणारा इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला. त्याने मध्य प्रदेशचा फलंदाज अजय रोहेराचा एफसी पदार्पणात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. रोहराने रणजी ट्रॉफीच्या २०१९ हंगामात हैदराबादविरुद्ध 267 धावांची नाबाद खेळी केली होती.
गनी हा उजव्या हाताचा फलंदाज आहे पण तो मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो. गनीने यापूर्वी १४ लिस्ट ए आणि ११ टी-२० सामने खेळले आहेत. बिहारकडून गनीचे पदार्पण २०१९ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये झालेआणि त्यानंतर २०२१ मध्ये त्याने पहिला टी-२० सामना खेळला होता.
महत्वाच्या बातम्या
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत- पंतप्रधान मोदी
- Shiv Jayanti 2022: दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती मोठ्या उत्साहात सुरु..!
- बाळासाहेबांचा प्रिय शिवसैनिक त्यांच्या चरणी रुजू होण्यासाठी स्वर्गस्थ झाला- संजय राऊत
- ऋषभ पंत मॅन ऑफ द मॅच घोषित झाल्यावर रोहितने केले ‘हे’ कृत्य
- मैदानावर पोस्टर नेत विराटचा पाकिस्तानी चाहता म्हणाला “ विराटने पाकिस्तानात…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

