🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने नाबाद १७५ धावांची सर्वश्रेष्ठ खेळी केली. जडेजाने या खेळीत १७ चवकार आणि ३ षटकार ठोकले.
तर आर अश्विनने ६१ धावांची अर्धशतकीय खेळी केली. जडेजा ज्या लयमध्ये खेळत होता. ते पाहून असे वाटत होते की, तो आज दुहेरी शतक करेल. परंतु असे झाले नाही. जडेजा हळूहळू आपल्या दुहेरी शतकाकडे जात होता. परंतु कर्णधार रोहित शर्माने जडेजा १७५ धावांवर असतानाच संघाचा डाव घोषित केला.
त्यामुळे सोशल मिडियावर रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका होत आहे. लोक म्हणत आहेत की, जडेजाला दुहेरी शतक करण्याची ही मोठी संधी होती. परंतु रोहित आणि द्रविडने पूर्ण होऊन दिली नाही.
बऱ्याच जणांनी ट्विट करत २००४ ची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले आहे. जेव्हा भारतीय संघ द्रविडच्या नेतृत्वात पाकिस्तानमध्ये गेला होता. तेव्हा मुल्तान येथील कसोटी सामन्यात सचिन तेंडूलकर १९४ धावांवर फलंदाजी करत असताना. द्रविडने डाव घोषित करून सचिनच्या स्वप्नांवरती पाणी सोडले होते. जडेजाचे दुहेरी शतक न होण्यामागे रोहित आणि द्रविडला कारणीभूत ठरवले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
