Share

लसीकरणाला औरंगाबादकरांचा वाढता प्रतिसाद सकारात्मक, लवकरच पुरवठा सुरळीत होईल-मनपा आयुक्त

Published On: 

औरंगाबाद : सध्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. मात्र या सर्वांमध्ये एक गोष्ट चांगली घडत आहे ती म्हणजे नागरिकांचा लसीकरणाला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद. येत्या काही दिवसांमध्ये लसींचा तुटवडा नक्कीच दूर होईल. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी (दि.१३) लसीकरणाच्या सद्यपरिस्थिती विषयी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

जून महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा चांगला झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले. परिणामी, आजघडीला कोरोना लसीकरणाचा आलेख पाच लाखांच्या घरात पोहचला आहे. मात्र आता मागील पंधरा दिवसांपासून लसींचा पुरवठा कमी होत आहे. लसीच शिल्लक राहत नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे. लसींच्या पुरवठ्यात खंड पडत असल्याने महापालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे.

लसीकरणाच्या सद्यपरिस्थितीबाबत मनपा आयुक्तांनी अखेर मौन सोडले आहे. लसींच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींबाबत बोलताना आयुक्त म्हणाले सध्या लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे मात्र त्या तुलनेत आपल्याकडे लसींचा साठा कमी आहे. यात मनपा प्रशासनाचा कुठलाही रोल नाही. वरतूनच उत्पादन कमी होत असल्यामुळे लसींचा साठा कमी होत आहे. मात्र येत्या काही दिवसात यात नक्कीच सुधारणा होईल. मात्र लसीकरणाला नागरिकांचा मिळणारा उत्तम प्रतिसाद ही खरी समाधानाची बाब आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!