औरंगाबाद : औषधी भवन जवळील झाल्यावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र वारंवार येथील काम वादात अडकत आहे. आता नुकतेच कामादरम्यान जेसीबीचा वापर केल्याने बीएसएनएलची केबल तुटली आहे. यामुळे भागातील सहाशे फोन बंद पडले असून यात पालिका मुख्यालयातील सत्तावीस लँडलाईनचाही समावेश आहे. त्यामुळे पालिकेचाही संपर्क जवळपास तुटला आहे. मात्र या संदर्भात मनपाने कुठलीही ठोस पावले उचलणे गरजेचे समजले नाही. त्यामुळे अजून तरी मनपा मुख्यालय आऊट ऑफ कव्हरेज आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने दलालवाडीतील औषधीभवनच्या नाल्यावर पुल बांधण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. पुलाच्या बांधकामासाठी जेसीबीच्या साहाय्याने पाया खोदत असताना बीएसएनएलची मुख्य केबल तुटली. त्यामुळे या भागातील ६०० लँडलाईन बंद पडले आहेत. आठ दिवसापासून फोनवरून संपर्क होत नसल्याने व्यापार्यांसह नागरिक हैराण झाले आहेत. केबल तुटल्याचा सर्वाधिक फटका पालिकेला बसला आहे. पालिका मुख्यालयातील २७ फोन बंद पडले आहेत.
याबाबत पालिकेने बीएसएनएलकडे तक्रार केली आहे. मात्र पुलाच्या कामामध्ये केबल तुटल्याने फोन बंद झाले असून केबल जोडणीसाठी जमीनीखालील मुख्य वायर काढावे लागणार असल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात आले आहे. पालिकेने कोरोना संदर्भात माहिती देण्याच्या दृष्टीने कोरोना हेल्पलाइन आणि तक्रार निवारण कें सुरू केले आहे. या केंद्रासाठी देण्यात आलेला फोन बंद पडल्यामुळे नागरिकांचा संपर्क होत नाही. हेल्पलाइनवर फोन करण्याची अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात बीएसएनएल कार्यालयाकडे विचारणा केली असता अधिकार्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत आठवडी बाजारांना परवानगी, मात्र नागरिकांनी गर्दी न करत संयम राखण्याची गरज!
- औरंगाबादला मिळाल्या फक्त पाच हजार लसी! दुसरा डोस घेणाऱ्यांची परवड
- ‘शिवसेनेलाच आता युतीची गरज असेल’; निलेश राणेंचा टोला
- ‘गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचा भाजपाने वापर करुन नंतर त्यांना डावलले’
- कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका, औरंगाबाद पालिका ९२१ बेडसह सज्ज!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

