Share

टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; ‘या’ दोन स्टार फलंदाजांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट 

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चारपैकी दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली मिळवली आहे. ओव्हनवर खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जखमी झाले होते तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अनफिट असल्यामुळेप्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता.

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला आहे आणि इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये अंतिम कसोटी खेळणार असल्याचं समजत आहे. शमी आणि इशांत शर्मा यांना किरकोळ दुखापतींमुळे ओव्हल कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. शमीने बुधवारी संघाच्या सराव सत्राला हजेरी लावल्याचे दिसले.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खेळाडूंच्या दुखापतींबाबत महत्वाची माहिती दिली आहे. ‘शमी तंदुरुस्त आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक विक्रम राठोड यांना पाचव्या सामन्यापूर्वी पर्यायांचा विचार करण्यास मदत होईल. वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे देखील जखमी आहेत आणि ते अजूनही वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. रोहितच्या दुखापतीत झपाट्याने सुधारणा होत असून रोहितची खेळण्याची शक्यता आहे, मात्र, वैद्यकीय संघाकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल.

जर रोहित योग्य वेळी फिट झाला नाही तर मयांक अग्रवाल, अभिमन्यू ईश्वरन आणि पृथ्वी शॉ यापैकी एकाला संधी दिली जाईल. पुजाराच्या अनुपस्थितीत हनुमा विहारी आणि सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!