औरंगाबाद: कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून परिस्थिती हाताबाहेर जाणायची भीती निर्माण होत आहे. अशातच कोविड केअर सेंटर अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार कुठे करावे असा प्रश्न सध्या मनपा समोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता नवीन कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दररोज एक केंद्र मनपाला सुरु करावे लागत आहे.
मार्च महिना सुरु झाला तसं कोरोना चाचण्या जोमाने सुरु करण्यात आल्या. तपासणी दरम्यान रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. तसेच अनेक केंद्रांवर मोठ्या रांगा लागत आहेत. दररोज चार ते पाच हजार तपासण्या करण्यात येत आहेत. त्यातून कोरोनाबाधीतांची संख्या सुद्धा वाढत आहे. अनेक केंद्रांवर खाटा उपलब्ध नसल्याची तक्रार सुद्धा अनेकांकडून करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आता नवीन कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सामान्य नागरिक आर्थिक अडचणीमुळे महापालिकेच्याच कोविड केअर सेंटरवर अवलंबून आहे. त्यामुळे आता महापालिकेवर कोविड केअर सेंटर सुरु करण्याची मोठी जबाबदारी पडली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशातच एकाच कुटुंबातील तीन ते चार व्यक्ती बाधित आढळून येत असल्याचेही चित्र समोर येत आहे. कोविड केअर सेंटर मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची भारती महापालिकेने सुरु केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- तैमुर बनला कुक; आई करीनाने केले कौतुक
- ‘कंगना जयललितांच्या भूमिकेत, मस्करी करताय का?’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केल मत
- पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, ७ जण जखमी
- ‘…मात्र महाराष्ट्र सरकार काही चेल्यांना हाताशी धरून वसुलीची योजना करतंय’
- पाकिस्तानला लस देणाऱ्या केंद्र सरकारच्या दानशूरपणाचं कौतुकच, जयंत पाटलांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
