🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशभरात ५० ठिकाणी ३०० आयकर आधिकाऱ्यांनी अचानक छापे मारत कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव कक्कर यांच्यासह रातुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली. इंदोरशिवाय, भोपाळ आणि गोवामध्येही दिल्लीच्या आयकर विभागाने छापे मारले आहेत.
कोण आहेत प्रवीण कक्कर ?
प्रवीण कक्कर हे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहतात. कमलनाथ मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर भुपेंद्र गुप्ता यांच्याजागी कक्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कक्कर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं होतं.कक्कर यांच्या इंदूरमधील घरावर रविवारी पहाटे तीन वाजता आयकर विभागाने अचानक छापा टाकत आतापर्यंत ९ कोटींची रोकड जप्त केली आहे. प्रवीण कक्कर यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. कक्कर यांच्या घराची १५ अधिकारी झडती घेत आहेत.
इंदोरशिवाय दिल्ली, भोपाळ आणि गोव्यामध्ये आयकर विभागाने तब्बल ५० ठिकाणी रविवारी केली छापेमारी
आयकर विभागाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या आयकर विभागाने तब्बल ५० ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरा सुरू झालेली ही कारवाई अद्याप सुरूच आहे. यामध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव कक्कर यांच्यासह रातुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. इंदोरशिवाय, भोपाळ आणि गोवामध्येही दिल्लीच्या आयकर विभागाने छापे मारले आहेत. या देशभरातील कारवाईसाठी तब्बल ३०० आयकर आधिकाऱ्यांचा समावेश आहे.
I-T Sources: I-T dept is conducting searches at 50 locations. Searches underway at locations of MP Chief Minister's OSD, Ratul Puri, Amira Group&Moser Bayer. Searches also underway in Bhopal* ,Indore,Goa& 35 locations in Delhi. More than 300 I-T officials conducting the searches. https://t.co/x5wkkEE01p
— ANI (@ANI) April 7, 2019
Delhi: I-T raid underway at residence of RK Miglani, close aide of Madhya Pradesh CM, in Green Park. pic.twitter.com/XEKcEpY8a7
— ANI (@ANI) April 7, 2019
Madhya Pradesh: I-T raid underway at Bhopal residence of Praveen Kakkar, OSD to Madhya Pradesh CM. Searches are also underway at his residence and official premises in Indore. pic.twitter.com/JBktgZjJvB
— ANI (@ANI) April 7, 2019
Indore: Visuals from official premises of Praveen Kakkar, OSD to Madhya Pradesh CM, where income-tax officials are conducting a raid. pic.twitter.com/fWoOS4qT4o
— ANI (@ANI) April 7, 2019
Pictures provided by Income-Tax Sources of cash recovered during raid at residential premises of Prateek Joshi in Bhopal, Madhya Pradesh. I-T searches are underway at 50 locations including Indore, Bhopal, Goa and Delhi. pic.twitter.com/TAMe4J1Nii
— ANI (@ANI) April 7, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

