Share

नाशिक मधील घटना दुर्दैवी आणि क्लेशदायक,चौकशी करणार : राजेंद्र शिंगणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना उपचार देण्यात येतात. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात १५० लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

या सर्व घटनेवर आता राज्याचे अन्न व औषध प्रशासना मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया येत आहे. ‘ हि घटना अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी दक्षता आम्ही घेणार आहोत. ह्या सगळ्या घटनेच्या चौकशीचे आदेश आम्ही देणार आहोत. तसेच या घटनेत नेमकी कोणाची चूक आहे हे शोधून दोषींवर कडक कारवाई करू’ असे ते म्हणाले आहेत.

ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!