Share

औरंगाबाद परिसरात गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान

Published On: 

औरंगाबाद : परिसरात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मक्का आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. बुधवारी दुपार नंतर वातावरणात अचानक बदल जाणवायला सुरूवात झाली होती. सायंकाळी लाडसावंगी आणि परिसरात अचानक गारा पडल्या. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका आंबा, डाळिंब, मोसंबी आदी फळांनाही बसलाय. ऐन बहरात असलेल्या आंब्याचा मोहर यामुळे गळून पडला आहे.

मराठवड्यात अनेक शेतकरी मोसंबी आणि डाळिंब या फळांची लागवड करतात. डाळिंबाला सध्या फुले लागलेली होती. मात्र, अचानक झालेल्या या गारपीटीमुळे डाळिंबाची फुले पडली आहे. आधीच अवकाळी नंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. त्यानंतर महावितरण वीज कनेक्शन कट करण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त होते. त्यात आता या गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले असून याचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आलीय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!