Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते माहिम बेस्ट बस डेपोचे उद्घाटन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण तसेच माहीम बस डेपोचे उद्याघाटन पार पडलं.  या वेळी बेस्टच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल धन्यवाद देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. कोरोनाच्या काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली व कुठेही अडचण येऊ दिली नाही. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बेस्ट बस आणि लोकल मुंबईची महत्वाची सेवा आहे. या सेवे मुळे मुंबईकर आपला प्रवास सुखकर करू शकता. तसेच या उद्घाटनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. ते म्हणाले, आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते माहिम बेस्ट बस डेपोचे उद्घाटन झाले. बेस्टच्या वर्धापन दिनानिमित्त बेस्टच्या ताफ्यात नव्या ईव्ही बस समाविष्ट करण्यात आल्याने या बसेसची संख्या २७० झाली आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १८०० ईव्ही बस असतील. असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठच्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणार्‍या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे बेस्ट.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!