मुंबई : शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केतकी चितळे हिने याआधीही केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केली होती. यानंतर केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तिला सत्र न्यायालयाने तीन दिवसांची म्हणजेच १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कुणाच्याही वडिलांवर, व्यक्तींवर त्यांनी मरावं असं कोण बोलतं? हे कुठल्या संस्कृतीत बसतं? मी यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं जाहीर आभार मानते. आपण अशा प्रकरणांमध्ये अशीच भूमिका कायम ठेवू. ही वेळ दुसऱ्या कुणावर आली तर मी सर्व प्रथम भूमिका घेईन”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच केतकी चितळे यांनी पोस्ट डिलीट करायची की ठेवायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्या देशात एक यंत्रणा आहे, पोलीस स्टेशन आणि कोर्ट आहे तिथं जाऊन न्याय मागावा. माध्यमांचा गैरवापर अशा गोष्टींसाठी करणं हास्यास्पद आहे, असे सुप्रिया सुळे यांनी चित्रा वाघ यांना अप्रत्यक्ष म्हंटले आहे.
मी ज्या मराठी संस्कृतीमध्ये वाढले त्या संस्कृतीमध्ये कुणीतरी मरावं असं कुणी बोलत नव्हतं. माझ्या वडिलांनी देखील ५५ वर्षांच्या राजकारणात मराठी संस्कृती जपली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुषमा स्वराज्य यांची आज महागाईच्या निमित्तानं आठवण आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी, असं गेल्या तीन महिन्यापासून म्हणत असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

