लातूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अल्यापासून राज्यात दलितांवर अन्याय व अत्याचार हे भरमसाठ वाढले आहे. राज्यातील सद्द स्थिती पाहता राज्याच्या गृहमंत्री अनील देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार तथा अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी केली आहे. निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माजी आमदार सुधाकर भालेराव यावेळी म्हणाले की, ‘निलंगा तालुक्यात बामणी येथे जगन्नाथ शिंदे या युवकाचा खून झाला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलायला होती, पण पोलिसांनी केवळ दोनच आरोपींना अटक केली होती. आम्ही आंदोलने करत प्रशासनावर दबाव निर्माण केला आणि आज संपूर्ण आरोपी अटक करण्यात आले आहेत. पोलिसांनी या घटनेमागील खऱ्या आरोपींचा शोध घ्यावा अशी आमची मागणी आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक जिल्ह्यांत दलितांवर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे.’ असे ते म्हणाले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहता राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. दलितावर होत असलेल्या अत्यचार व अन्यायाविरोधात आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत असे, माजी आमदार भालेराव यांनी पञकार परिषदेत सांगितले.याप्रसंगी गोविंद सूर्यवंशी, गंगाबाई कांबळे, सत्याभाई शिंदे, संजय हलगरकर, अजय कांबळे, सोमनाथ कदम, सतिश शिंदे, सिताराम कांबळे, राम कांबळे, बजरंग कांबळे, प्रदीप थोरात, ओम शिंदे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘मास्कचा वापर करा, फोटो व्हायरल होताहेत’ राष्ट्रवादीच्या नेत्याचा धनंजय मुंडेंना सल्ला
- मार्चमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, तब्बल ११ दिवस बँका बंद !
- ‘विराट कोहली कोणतं काम करु शकत नाही?’, ICC ने शेअर केला व्हिडीओ
- ‘महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- मारुती सुझुकी स्विफ्टचा मेकओव्हर अपडेटेड व्हर्जन लवकरच बाजारात येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

