Share

मारुती सुझुकी स्विफ्टचा मेकओव्हर अपडेटेड व्हर्जन लवकरच बाजारात येणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या बाजारात कार्सचे नवनवीन अद्ययावत व्हर्जन येत आहेत. यामध्ये आता भारतातील सर्वात लोकप्रिय कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी स्विफ्टचा मिडलाईफ मेकओव्हर केला जाणार आहे.या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल. फेसलिफ्टेड स्विफ्टने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर जपान आणि युरोपसारख्या निवडक बाजारात या कारची विक्री सुरु झाली आहे.

स्विफ्टचे थर्ड जनरेशन मॉडेल 2017 पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारचे नवीन मॉडेल लवकरच नव्या अपडेट्ससह सादर केलं जाणार आहे. फेसलिफ्ट स्विफ्ट लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने या कारचा पहिला अधिकृत टीझर जारी केला आहे. या कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास स्विफ्ट 2021 मध्ये फारसा बदल होणार नाही आणि ही कार आंतरराष्ट्रीय व्हेरिएंटप्रमाणेच असेल. कारच्या पुढच्या बाजूला हेडलॅम्प्सच्या आकारात थोडा बदल पाहायला मिळेल, तर क्रोम आणि ग्रीलदेखील पूर्णपणे बदललं जाईल. बम्परमध्ये थोडा बदल झाला आहे, जेणेकरून फॉग लँप किंचित बाहेरच्या बाजूला दिसेल. टीझर व्हिडिओसह मारुती सुझुकीने म्हटलं आहे की, लिमिटलेस थ्रिल, स्टनिंग लुक्ससह नवी स्विफ्ट येतेय, त्यासाठी तुम्ही तयार व्हा.

आतील भागात (इंटीरियरमध्ये) फारसा बदल दिसणार नाही, सर्व काही जुन्या कारप्रमाणेच असेल. परंतु पूर्ण ब्लॅक थीममध्ये सिल्व्हर इंटस्र्ट्ससह काँट्रास्ट दिला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला 7.0 इंचांची स्मार्टप्ले स्टूडियो इंफोटेन्मेंट सिस्टिम मिळेल जी अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह येते. तसेच या गाडीत सेमी डिजिटिल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिलं जाऊ शकतं, जे 4.2 इंचांच्या कलर MID, क्लायमेट कंट्रोल, पुश बटन, हिल होल्ड कंट्रोल आणि ESC सह येतं. या कारमध्ये 1.2 लीटरचं नॅचुरली एस्पीरेटेड डुअल जेट पेट्रोल युनिट दिलं जाऊ शकतं. जे 89 bhp आणि 113 Nm पीक टॉर्कसह सादर केलं जाईल. युनिटमध्ये 5 स्पीड मॅनुअल गियरबॉक्स आणि 5 स्पीड एएमटी दिलं जाईल. लाँचिंगनंतर ही कार ह्युंदाय ग्रँड i10 नियॉस आणि फोर्ड फिगो या कारला टक्कर देईल. या कारची किंमत 5.19 लाख रुपये ते 8.02 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!