🕒 1 min read
मुंबई : संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.
‘मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे.
मात्र, विरोधकांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे पाहायला मिळतंय. अजूनही संजय राठोड यांच्यावर विरोधक नानाविध आरोप करत आहेत. तसेच राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
जो बोया है…..वही पायेगा !!
तेरा किया आगे आयेगा !!!महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्यार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा #JusticeForPoojaChavan pic.twitter.com/lT3SYj1gi9
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 24, 2021
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ‘जो बोया है, वही पायेगा’ असे म्हणत राठोडांवर निशाणा साधला आहे. ‘जो बोया है…..वही पायेगा !! तेरा किया आगे आयेगा !!! महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. #JusticeForPoojaChavan’, अशा आशयाचे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली भूषणसिंह राजे होळकरांनी मागणी
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांवर देखील निर्बंध
- ‘पालघर साधू हत्याकांडापासून पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे’
- विमानप्रवाशांसाठी खुशखबर! नांदेडहून जळगाव, अहमदाबादला विमानसेवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
