मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अशोक चव्हाण, अजित पवार यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं. तर, ठाकरे व मोदी यांची वैयक्तिक वेगळी भेट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पत्रकार परिषदेमध्ये खुद्द उद्धव ठाकरेंनी या भेटीची कबुली दिली आहे.
‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिकरित्या ३० मिनिटे भेट घेतली. सत्तेत एकत्र नाहीत याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. या भेटीत वावगं काहीच नाही. मी काही नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो,’ असा टोला लगावतानाच आजची भेट ही अधिकृत असल्याची देखील त्यांनी आवर्जून नोंदवलं आहे.
याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच रंगू लागले असल्याचे चित्र दिवसभरापासून पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यावरून आता टोमणे मारायला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले आहे यात ते म्हणाले कि,’ आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको.’ अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी टोमणा मारला आहे.
आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2021
दरम्यान, मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या भेटीसाठी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- सोयाबीन पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी – कृषि अधिकारी अशोक खेडकर
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

