Share

सोयाबीन पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी – कृषि अधिकारी अशोक खेडकर

Published On: 

औरंगाबाद : मागील वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे चालु हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणी करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समिती कृषि अधिकारी अशोक खेडकर यांनी केले आहे.

परवानाधारक विक्रेत्याकडून सील बंद वेस्टन व लेबल असलेले बियाणे खरेदी करावे.बियाणे खरेदीची पावती ,बिल खरेदी केलेल्या बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे की पिक ,वाण, संपूर्ण लॉट नंबर, वजन, बियाणे कंपनीचे नाव, बियाणे किंमत खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, सही इत्यादी नमूद असलेली रोखीची अथवा उधारीची पावती घ्यावी. बियाणे खरेदी करताना वैद्य मुदतीची खात्री करून घ्यावी व वैद्य मुदतीच्या आतील बियाणे खरेदी करावे.

पिशवी वर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये. बियाणे खरेदी ची पावती, वेस्टन बॅग व त्यावरील लेबल टॅग इत्यादी जपून ठेवावे. पेरणीपुर्वी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी बिज प्रकीया करणे आवश्यक आहे. पेरणीपुर्वी बियाणे उगवणक्षमता तपासुनच पेरणी करावी. योग्य वाणाची निवड, वाणांची उत्पादन क्षमता, जमीनीची प्रत, ओलीताची सोय, दुबार पिक घेण्याची तयारी या बाबींचा विचार करुन योग्य वाणांची निवड करावी, असे आवाहन पं.स.कृषी अधिकारी अशोक खेडकर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!