औरंगाबाद : शहरातील बीड बायपास हा प्रचंड रहदारीचा मुख्य रस्ता आहे. मात्र अनेक वर्षापासून या परिसरातील नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. खराब रस्त्यांमुळे याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. आमदार संजय शिरसाट यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यासाठी शासनाकडून ३८३ कोटी रुपये मंजूर करून घेतले. हायब्रिड अॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून सुरू असलेल्या सहा पदरी रस्त्याच्या कामाची त्यांनी रविवारी (दि.३०) पाहणी केली. पुढील आठवड्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील पाहणी करण्यासाठी येणार आहेत.
औरंगाबाद शहराची लाईफ लाईन बनलेल्या बीडबायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेला होता. गेल्या काही वर्षाभरात या बीडबायपासवर झालेले अपघात व त्यामुळे उद्धवस्त होणारी कुटुंबे, अनाथ होणारी मुले यांचा सारासार विचार करुन आमदार संजय शिरसाट यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी या बीडबायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गांभीर्याने मांडला. शासनाकडून ३८३ कोटी रुपये मंजूर झाल्याने बीड बायपासकराना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
हायब्रिड अॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून सुरू असलेल्या सहा पदरी रस्त्याच्या कामाची आमदार संजय शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकार्या सोबत घेऊन पाहणी केली. या पाहणीत आमदार शिरसाट यांनी महानुभाव आश्रम, केम्ब्रिज शाळा ते झाल्टा फाटा व झाल्टा फाटा ते असा एकूण १७ किलोमीटर लांबीच्या बायपासवर पाहणी केली. वर्दळीच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूला ७ मीटर सर्व्हिस रोड सोडण्यात यावा, जेणे करून नागरिकांना येण्या जाण्याची सोय उपलब्ध होईल. तसेच एमआयटी कॉलेज समोरील पुलाचे काम देखील लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश देखील शिरसाट यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही’, सुप्रीम कोर्टाने पोलिसांना खडसावले
- पुणेकरांना दिलासा : मद्यविक्रीसह इतर दुकानांना ‘या’ वेळेत परवानगी !
- ‘राज्याला केंद्राकडून GST चा परतावा आणि आर्थिक मदत मिळवून देणार’ ; रामदास आठवलेंची ग्वाही
- औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या नवीन अंशदायी पेन्शन वाटपात मोठा घोळ!
- चिमुकलीचा छळ करणाऱ्या निर्दयी पित्याविरूध्द गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

