Share

सातारा परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ, आजू-बाजूची दोन घरे फोडली

Published On: 

औरंंगाबाद : सातारा परिसरात लक्ष्मी कॉलनी भागात एकाच भागात एकमेकाच्या बाजुला असलेल्या दोन घरातून चोरटयाने सोन्याचे चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही घरफोड्या १६ ते १७ जून या काळात घडल्या असल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली आहे.
घराला लॉक लावून गणी नामदार तडवी (वय ४२, रा. लक्ष्मी कॉलनी सातारा परिसर) हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या भालगाव या गावी गेले होते. तडवी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटयाने घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाट फोडून कपाटातील ५५ हजार रूपये किंमतीचे दागीने चोरून नेले.
तसेच गणी तडवी यांच्या घराजवळ राहणाऱ्या भंडारी यांच्या घरातूनही चोरट्याने किंमती ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गणी तडवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!