Share

पवनराजे निंबाळकर खुन खटल्यात डॉ. पद्मसिंह पाटील यांना हजर राहण्याचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या वाटेवर गेलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  ३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर यांचा कळंबोली येथील खुन झाला होता. या प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सह इतर ९ जनांवर सीबीआय मार्फत गुन्हा दाखल होवून दोषारोप पत्रही दाखल झाले आहे. सदर खटला मुंबई येथील सत्र न्यायालयात चालू आहे.

सदर प्रकरणातील आरोपी पारसमल ताराचंद बदाला जैन याने न्यायालयात माफीचा साक्षीदार म्हणुन साक्ष देण्यासाठी अर्ज सादर केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने मंजुर केल्यानंतर मागील बऱ्याच तारखेपासून सदर माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांची मुंबईतील सत्र न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली. त्यानुसार ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी सदर खटल्यामध्ये तारीख नेमलेली होती. सदर दिवशी सदर माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांनी सर्व आरोपे यांची ओळख न्यायालयास पटवून दिली. परंतु त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील हे गैरहजर होते. त्यांच्या वकीलांनी डॉ. पद्मसिंह पाटील आजारी असल्याचे कारण पुढे करत ते खटल्यात हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे मुदत मागीतली होती.

त्यावेळी सदर प्रकरणातील फिर्यादी श्रीमती आनंदीदेवी भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी सदर खटल्यात नेमलेल्या खासगी वकीलांनी डॉ. पद्मसिंह पाटील हे आजारी नसून ते अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीता विविध ठिकाणी हजर असल्याचे तसेच विविध कार्यक्रमात हजेरी लावत असल्याचे फेसबुक पोस्टद्वारे दिसून येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. सदरचा खटला हा माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांचेकडून डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख पटविणेकरीता नेमलेले असताना डॉ. पद्मसिंह पाटील आजारी असल्याचे कारण दाखवून न्यायालयात हजर राहण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आले.

डॉ. पद्मसिंह पाटील यांची उपस्थिती सदर खटल्यात अनिवार्य असल्याने ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने कोर्टात हजर राहण्यास मुदत मिळण्याच्या अर्जावर मा. सत्र न्यायालय मुंबई यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी येणाऱ्या पुढील तारखेस म्हणजेच दि. १३ ऑक्टोंबर २०२ रोजी हजर रहावे अन्यथा अटक वारंट काढण्यात येईल असा आदेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!