Share

Fashion Tips | ओव्हरसाईज टी-शर्ट ट्रेंडमध्ये, ‘या’ स्टाइल बनवतील तुमचा ड्रेसिंग सेन्स अधिक चांगला

Published On: 

अलीकडच्या काळात फॅशन जगात ओवरसाइज कपड्यांचा ट्रेंड वाढला आहे. मुलगा असो की मुलगी, सगळ्यांनाच ओवरसाइज कपडे घालायला आवडतात. बदलत्या फॅशन ट्रेंडकडे पाहता सध्या मुलींमध्ये ओव्हरसाईज टी-शर्ट ची क्रेझ पाहायला मिळत आहे. ते घालायला जेवढे आरामदायी आहेत तेवढेच ते तुम्हाला चांगला लुकही देतात.

हे ओवरसाइज टी-शर्ट जास्त लोकप्रिय आहेत कारण आपण त्यांना शॉर्ट्स, जीन्स, अगदी स्कर्टसोबत घालू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा ओव्हर साइजचा टी-शर्ट कसा आणि कोणत्या स्टाईलमध्ये कॅरी करता येईल हे जाणून घ्यायचे असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा स्टायलिंग टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या ड्रेसिंग सेन्समध्ये भर पडेल.

ड्रेस स्टाईल देईल उत्तम लुक

या प्रकारच्या स्टाइलसाठी बेल्टची आवश्यकता असेल. तुम्ही टी-शर्टला शॉर्ट ड्रेसप्रमाणे स्टाईल करू शकता. तुमच्या ओवरसाइज टी-शर्टवर बेल्ट लावा. तुमचा टी-शर्ट स्टायलिश ड्रेससारखा दिसेल. यासोबत तुम्ही ब्लेझरही ट्राय करू शकता. पण त्यासोबत बूट घालून दागिने कॅरी केले तर तुमचा लुक पूर्ण होईल.

नॉट स्टाईलमध्ये शर्ट ट्राय करून बघा

तुम्ही तुमचा ओव्हरसाईज टी-शर्ट नॉट स्टाइलमध्येही स्टाईल करू शकता. हा लूक आजकाल खूप लोकप्रिय आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हाई वेस्ट जीन्स सोबत देखील ओव्हरसाईज टी-शर्ट घालू शकता. यामुळे तुम्हाला स्टायलिश आणि मस्त लुक मिळेल.

टक स्टाइलमध्ये सुद्धा सुंदर दिसेल

जर तुम्हाला साधा कॅज्युअल लुक हवा असेल तर तुम्ही टक इन स्टाइलिंग करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ओव्हरसाईज टी-शर्टला जीन्स किंवा ट्राउझर्समध्ये इन करावे लागेल. यामुळे तुम्हाला खूप स्टायलिश लुक मिळेल. जर तुम्हाला अधिक चांगले कॉम्बिनेशन हवे असेल तर तुम्ही डेनिम शॉर्ट्स किंवा स्कर्टसोबत पेअर करू शकता.

ऑफ शोल्डर ग्लॅमरस दिसेल

तुम्ही तुमच्या ओवरसाइज टी-शर्टने ऑफ शोल्डर लूक तयार करू शकता. हे तुमचे व्यक्तिमत्व अधिक छान व आकर्षक बनवेल. या स्टाइलमध्ये तुमचा लूक अधिक आकर्षक बनवायचा असेल तर तुम्ही कॉन्सर्ट बेल्ट वापरून पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!