बदलत्या जीवनशैलीमुळे आपली दिनचर्या पूर्णपणे बदलून गेली आहे. ना उठण्याच्या वेळा फिक्स ना झोपण्याच्या. इतकंच नाही तर काही लोक आपल्या आहाराकडे देखील लक्ष देत नाहीत. परंतू या सगळ्याचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो. अशा लाईफ स्टाईलमुळे काहींना अनेक अजारांना सामोरं जावं लागत असते. त्यामध्ये ‘डायबिटीज’ या आजाराने अनेकजण त्रस्त असतात. जर तुम्हीही या आजाराच्या त्रासाला कंटाळला असाल, तर आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत.
तुम्हाला जर डायबिटीज असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये खालील फळांचा समावेश केलात, तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
1. सफरचंद – सफरचंद हे सर्वात फायदेशीर फळ मानले जाते. कारण यामध्ये पॉलिफेनॉल नावाचे संयुग असते. जे रोगांशी लढण्याचे काम करते. या फळाची साल अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी एजंट म्हणून काम करतं असते. तसेच सफरचंद हृदय, आतडे आणि त्वचेच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे काम देखील करते. हे फळ कर्करोगाशीही लढते. त्याचबरोबर हे फळ जर तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत खाल्ले तर त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल.
2. संत्री – आंबट, रसाळ आणि पोषक तत्वांनी युक्त असलेलं फळ म्हणजे संत्री. त्यामुळे संत्री मधुमेहाच्या रुग्णांसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. संत्र्यामध्ये असलेले हेस्पेरिडिन तुमच्या हृदयाच्या आरोग्याची आणि कोलेस्टेरॉलच्या पातळी संतुलीत ठेवते. हे फळ मुक्त रॅडिकल्सशी लढते आणि लोहाचे चांगले शोषण करण्यास मदत करते. त्यात आढळणारे फोलेट हे दुसरे संयुग किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखते. संत्री हे फळ आम्लयुक्त असते, म्हणून ते रिकाम्या पोटी किंवा निरोगी जेवणानंतर खाऊ नका. त्याऐवजी, तुम्ही ते जेवणादरम्यान स्नॅक म्हणून खाल्लं तर तुमच्या शरिरात ते उपयुक्त ठरेल.
3. डाळिंब – डायबेटीस मध्ये डाळिंब हे फळ खाऊ शकतो का? हा असा प्रश्न अनेक रूग्णांना पडलेला असतो. तर होय! तुम्ही डाळिंब खाऊ शकता. तुम्हाला मधुमेह असला तरीही तुम्ही डाळिंब खाऊ शकता. डाळिंब हे असेच एक फळ आहे, जे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्सने भरलेले आहे. म्हणजेच त्यात ग्रीन टीपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. जे अर्ध्या तासातच आपल्या शरीरावर प्रभाव दाखवू लागतात.
4. किवी – किवी हे असे फळ आहे, जे तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला फायदेशीर आहे. चांगली गोष्ट म्हणजे ते खायलाही स्वादिष्ट असते. किवीमध्ये व्हिटॅमिन बी 6, सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. किवी रक्तदाब कमी करते आणि त्यात असलेले व्हिटॅमिन-के जखमा लवकर भरून काढते. जे मधुमेहांच्या रूग्णांसाठी उपयुक्त ठरते. हे फळ आतड्याची हालचाल कमी करण्यासाठी, वजन नियंत्रित करण्यासाठी आणि किडनी स्टोन टाळण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासोबतच हे फळ रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवते. तसेच तुम्ही किवी रात्री झोपताना किंवा नाष्ट्याच्यावेळी खाऊ शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | एका दिवसात किती मीठ, साखर आणि तेल खावे? WHO ने सर्वांना केलं अलर्ट
- Shivsena | “उलट-सुलट बोलाल तर, तुमची शुगर…”; शिवसेनेकडून नारायण राणेंना इशारा
- PNB Kisan Yojana | शेतीशी संबंधित प्रत्येक गरज आता होईल पूर्ण,शेतकऱ्यांच्या ‘या’ बँक अकाऊंट मध्ये होणार 50,000 रुपये जमा
- Shambhuraj Desai | राष्ट्रवादीतील अनेक लोक आमच्या संपर्कात ; शंभूराज देसाई यांचा मोठा दावा
- Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतला फोटो मॉर्फ केलेला, FACT CHECK
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

