भारतीय परंपरेमध्ये आयुर्वेदाला खूप महत्व आहे. या आयुर्वेदामध्से मधाचे महत्व खूप असल्याचही सांगितले गेले आहे. मध आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. जर आपल्याला काधी खोकला किंवा घशात खवखव करत असल्यास तुम्ही मध खाल्ले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. याव्यतिरीक्त पण, मधाचे अनेक फायदे आहेत. ते जर तुम्हाला माहिती नसतील तर काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला त्याचविषयी सांगणार आहोत.
1. पुरळ –
आपल्यातील काहींना पुरळ येत असतात. त्यातील काहींना चेहृ्यावर येतात तर काहींना संपूर्ण शरीरावर असतात. यासाठी मध उपयुक्त औषध ठरू शकते. कारण मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस रोखणारे पदार्थ असतात. तसेच त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे मुरुम आणि मुरुमांमुळे होणारे जंतूंशी लढतात. यासाठी त्वचेवर मध लावा आणि कोरडे होऊ द्या. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला काही दिवसातच फरक वाटू लागेल.
2. त्वचा चमकदार करण्यासाठी –
मधामध्ये काही अशी संयुगे असतात, जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. तसेच त्यांच्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर ठेवण्यासही मदत होते.
3. टॅनिंग – आपण बाहेर जाताना काहीवेळेस संपूर्ण शरीर झाकतील असे तरडे घालून जात नाही. त्यावेळी आपल्याला टॅनिंगचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही टॅनिंगची समस्या असेल त्या भागावर तुम्ह मध लावू शकता. त्यामुळे काळवंडलेली त्वचा लवकर पूर्वी सारखी होईल. यासाठी मधामध्ये कोरफडीचा गर टाकून त्याची पेस्ट करा आणि ती त्वचेवर लावा.
महत्वाच्या बातम्या :
- Hydrated Body | उपवासाच्या काळात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टींचे करा सेवन
- Congress । थरूर, गेहलोत आणि दिग्विजय सिंह यांच्यानंतर आता अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींच नाव चर्चेत
- Eknath Shinde | कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- NCP | “भाजप एकनाथ शिंदेंच्या आडून हुकूमशाही आणि मनुस्मृतीचं राज्य आणू पाहत आहे”
- IND vs SA T20 Live । अर्शदीप-चहरचा कहर, दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

