Share

Exercise For Heart | हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी दररोज करा ‘या’ एक्सरसाइज

Published On: 

आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. ज्या गोष्टींसाठी आधी काही दिवस लागायचे आता ते काम काही तासांमध्येच होते. परंतू यासगळ्यामुळे आपली संपूर्ण लाईफस्टाईल बदलली आहे. याचा परिणाम नकळतपणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. कामाचा जास्त ट्रेस, दररोजचं धकाधकी जीवन. याचाच परिणाम अनेक लोकांना हृदयावर ताण येतो. तर काहींना हृदयाचे विकार असतात तर अशा लोकांना आणि ज्यामुळे हृदयाचे आरोग्य वाढेल, अशा दिनचर्येमध्ये कोणत्या एक्सरसाइज करायच्या हा प्रश्न पडत असतो. परंतू आज आम्ही तुम्हाला निरोगी हृदय राहण्यासाठी काही एक्सरसाइज सांगणार आहोत.

1. कार्डिओ –
हृदय निरोगी ठेवण्यासाठी कार्डिओ व्यायाम सर्वोत्तम मानला जातो. यामध्ये जॉगिंग, ट्रेडमिलवर चालणे, सायकलिंग यांचा समावेश होतो. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर तुम्हाी या एक्सरसाइज दररोज नियमित करणे आवश्यक आहे. यामुळे हृदयाची गती वाढते आणि आजूबाजूचे स्नायू मजबूत होतात. त्याचबरोबर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

2. जंपिंग जॅक्स –
जंपिंग जॅक हा एरोबिक कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे तुमचे हृदय जलद काम करते आणि तुमचे वजनही वेगाने कमी होते. तसेच, जंपिंग जॅक्स हा व्यायाम हृदयासाठी खूप चांगला मानला जातो. हा सर्वात सोपा व्यायाम आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही मशीनची गरज नसते आणि तुम्हाला जिममध्ये जाण्याचीही गरज नाही. तुम्ही हे कुठेही करू शकता. हे करण्यासाठी, सरळ उभे रहा आणि नंतर वर उडी मारा. त्यानंतर हात वर करा, मग पाय पसरवा. खाली येतानी सुरूवातीच्या स्थितीत जा.

3.चालणे-
हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालत जा. तुम्हीजर चालत असाल तर, त्याने तुमचे हृदय मजबूत होण्यास मदत होते. चालण्याने पायांच्या सांध्यांवर फारसा परिणाम होणार नाही आणि रक्ताभिसरणही व्यवस्थित राहते, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहील.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!