Share

रोहिंग्यांना आश्रय दिल्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या, अफगानी नागरिकांना आम्ही आश्रय देणार नाही – बांगलादेश

Published On: 

ढाका – तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी तेथून पळ काढत आहेत. सोमवारी विमानतळावर झालेल्या गर्दीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर विमानाच्या चाकाला लटकलेल्या लोकांपैकी काही जण खाली पडून मृत्यूमुखी पडले. एकूणच अशा भयावह स्थितीमध्ये अफगाणिस्तानात विविध देशांमधील अडकलेले अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांसाठी गेलेले नागरिक हे सुरक्षित स्थळी परतण्यासाठी धडपड करत आहेत.

यातच आता अफगाणिस्तानमधील अराजकामुळे उद्भवलेल्या अस्थिर परिस्थितीत त्या देशातून इतर देशात जाणाऱ्या काही नागरिकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून तात्पुरता आश्रय द्यावा, ही अमेरिकेची विनंती बांगलादेशनं फेटाळली आहे. अफगानिस्तानमधल्या देशांतर करणाऱ्या अशा निर्वासित नागरिकांना आपण आश्रय देऊ शकत नाही, असं बांगलादेशानं कळवलं आहे.

म्यानमा इथून आलेल्या रोहिंग्यांना आश्रय दिल्यामुळे बांगलादेशमध्ये अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे आता नव्या समस्यांना बांगलादेश सामोरे जाऊ इच्छित नाही, असं बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर ए. के. अब्दुल मोमेन यांनी ढाका इथं आज सांगितल्याचं युनायटेड न्यूज ऑफ बांगलादेशनं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये देशातील नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कोणत्याही सरकारचं बांगलादेश स्वागतच करेल, असं मोमेन यांनी यापूर्वी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!