नवी दिल्ली- कोविड-19 विरुदध सुरू असलेल्या लढाईत सहभाग देत भारतीय रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली आहे. द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूने भरलेले टँकर्स घेऊन आलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसेस आज महाराष्ट्रातील नाशिक आणि उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे पोहोचले. काही टँकर वाटेतील नागपूर आणि वाराणसी येथे संबधित भागातील प्राणवायूची गरज लक्षात घेऊन उतरवण्यात आले. याशिवाय आज सकाळी लखनऊ येथून तिसऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने आपल्या प्रवासाला आरंभ केला.
आंध्रप्रदेश, दिल्ली यासारख्या काही राज्यांनी अजून अशा एक्स्प्रेस पाठवण्याबाबत रेल्वेशी चर्चा सुरू केली आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरुप प्राणवायूने भरलेले टँकर्सचा विशाखापट्टणम व बोकारो येथे जाण्यासाठीचा प्रवास भारतीय रेल्वेच्या रो-रो सेवेमार्फत सुरू आहे.
वैद्यकीय वापरासाठीच्या प्राणवायूची उत्तर प्रदेशची गरज भागवण्यासाठी लखनऊ व वाराणसी दरम्यान विशेष प्रवासी मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार केला आहे. हे 270 किमी चे अंतर ताशी सरासरी 62.35 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडीमुळे 4 तास 20 मिनिटात कापले जाते. आतापर्यंत 10 कंटेनर्सनी जवळपास 150 टन प्राणवायू पोहोचवला आहे.
लांब पल्ल्यासाठी रेल्वेने प्राणवायूची वाहतूक करणे हे रस्ते वाहतूकीपेक्षा जलद गतीने होते. रेल्वे वाहतूक पूर्णवेळ (24X7) सुरू राहू शकते. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत रेल्वेने अत्यावश्यक जीवनोपयोगी वस्तूंची वाहतूक करून पुरवठा साखळी अबाधित राखली होती, आणि संकटाच्या काळात देशसेवेचे कर्तव्य बजावले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील गरीब जनतेला मोफत लस मिळणार का ? अजित पवार म्हणाले…
- शरद पवार यांच्या तोंडातील अल्सर काढला; तब्येत एकदम ठणठणीत
- …म्हणून अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे; जयंत पाटील यांचा अजब दावा
- राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार – अजित पवार
- पालकमंत्री मलिक यांना हटवण्याची प्रहार संघटनेनी मागणी, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन


