Share

‘द हंड्रेड’ स्पर्धेत स्मृतीचा जलवा, धोनीच्या अंदाजात केला सामन्याचा शेवट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंडमध्ये सुरु असलेली ‘द हंड्रेड’ ही क्रिकेट स्पर्धा सुरुवातीपासूनच वेगळ्या शैलीसाठी चर्चेचा विषय बनली आहे. या खेळाचे नियम आणि स्वरुप यामुळे क्रिकेट रसिकात या स्पर्धेबाबत खुप उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटु या स्पर्धेत सहभागी होत असल्याने स्पर्धेची लोकप्रीयता वाढली आहे.

या स्पर्धेत भारतीय महिला संघाची आघाडीची खेळाडू स्म्रृती मंधाना ही साउदर्न ब्रेव्ह वूमन संघाकडून खेळत आहे. साउदर्न ब्रेव्हकडून खेळताना मंधानाने वेल्स फायर वूमनच्या गोलंदाजाची जोरदार धुलाई केली. या सामन्यात स्रृतीने ३९ चेंडुत ५ चौकार आणि ३ षटकारासह ६९ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात स्मृतीने अखेरच्या चेंडुवर षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारतीय पुरुष संघाचा माजी क्रिकेटपटु महेंद्रसिंह धोनीने अशाप्रकारे अनेक वेळा भारतीय संघाला षटकार मारुन विजय मिळवून दिला आहे. या सामन्यात वेल्श फायर संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावत ११० धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात साउदर्न ब्रेव्ह वुमन संघाने ८४ चेंडुतच २ गडी गमावत हे आव्हान पार केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!