Share

पहिल्या फेरीत ‘अनसोल्ड’ मात्र दुसऱ्या फेरीत हरभजन व केदारला ‘या’ संघात मिळालं स्थान !

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा आज पार पडत आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

आज अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. पहिल्या फेरीत चेन्नई संघाने सोडलेल्या केदार जाधव व हरभजन सिंग यांना बोली लागली नव्हती. मात्र, लिलावाच्या दुसऱ्या फेरीत या खेळाडूंवर बोली लागली आहे. केदार जाधव याला सनराईझर्स हैद्राबादने तर हरभजनला कोलकाता नाईट राइडर्सने संघात घेतलं आहे.

केदारला २ कोटींच्या बोलीने सनराईझर्स हैद्राबादने तर हरभजनला कोलकाता नाईट राइडर्सने २ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. दरम्यान, क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या १४ व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सचिन तेंडुलकचा सुपुत्र पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सामील होणार असल्याने अनेक क्रिकेट रसिकांच्या त्यांच्या लिलावाकडे लक्ष्य लागलं होतं. मुंबई इंडियन्सनेच त्याच्यावर बोली लावत २० लाखांमध्ये त्याला खरेदी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!