🕒 1 min read
इंग्लंड : जागतीक कसोटी चॅम्पियशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव संपुष्टात आला आहे. पहिल्या डावात भारताने सर्वबाद 217 धावांची मजल मारली. यानंतर न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे 70 धावांची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. न्यूझीलंडचे फलंदाज सामन्यावरील पकड हळूहळू मजबूत करत असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली भर मैदानावर भांगडा करताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 3 बाद 146 पासुन पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र केवळ तीन धांवाची भर घालुन कर्णधार कोहली 44 धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतने केवळ 4 धावांची भर घालुन बाद झाला. यादरम्यान अंजिक्य रहाणेने काही काळ संघर्ष सुरु ठेवला. तो बाद झाल्यावर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने काही काळ पडझड थांबवुन ठेवली. दोघांनी भारताची धावसंख्या 200 च्या पार नेली. मात्र अश्विन बाद होताच जडेजा जास्त काळा टिकु शकला नाही. आणि 92.1 षटकात भारताचा संपुर्ण संघ 217 धावांवर बाद झाला.
https://twitter.com/allaboutcric_/status/1406620911369740291?s=20
भारताच्या पहिल्या डावात उपकर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधीक 49 धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. तर न्युझीलंडकडुन कायली जेमिनसनने सर्वाधीक 5 गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या
- चालू सामन्यात कर्णधार कोहली इशांतला म्हणाला, ‘विचारतोयस का ओरडतोयस?’
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
