🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी रिलीज आणि रिटेन खेळाडूंच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहे. त्यामध्ये काही फ्रेंचाईजींनी आपल्या ठराविक खेळाडूंना संघात ठवले असून काही खेळाडूंना करारमुक्त केले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या या हंगामामध्ये अनेक संघांमध्ये बरेच बदल झाल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या हंगामामध्ये मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad SRH) या संघांमध्ये दिसू शकतात. असा अंदाज माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा (Akash Chopda) यांनी व्यक्त केला आहे. कारण मिनी लिलावानंतर (Mini Auction) सनरायझर्स हैदराबाद या संघाकडे सर्वाधिक पैसे उरले आहे. त्यामुळे SRH आता मोठ्या खेळाडूंवर दाव लावायचे धाडस करू शकतो, असेही त्याने म्हटले आहे.
आकाश चोपडा त्याच्या यूट्यूब चॅनल म्हणाला आहे की,”सध्या सनरायझर्स हैदराबाद मध्ये एडन मारक्रम, राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा हे खेळाडू आहेत. या तिघांनंतर SRH मध्ये फलंदाजीसाठी पर्याय उरत नाही. त्यामुळे या संघाला फलंदाजाची मोठी गरज आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावामध्ये हैदराबाद बेन स्टोक्स आणि मयंक अग्रवाल यांच्यावर मोठा दाव लावू शकते.”
पुढे आकाश चोपडा म्हणाला आहे की,”माझ्या मते मयंक अग्रवाल सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये जाणार आहे. त्याचबरोबर मनीष पांडे देखील या संघामध्ये असू शकतो. या दोघांसोबत फ्रेंचाईजीला बेन स्टोक्सचा संघात समावेश करायला आवडेल. लिलावापूर्वी हैदराबादकडे भरपूर पैसे शिल्लक आहे. दरम्यान, संघामध्ये चांगले गोलंदाज असल्यामुळे त्यांना आणखी गोलंदाज विकत घेण्याची गरज नाही.”
IPL 2023 मध्ये केन विलियम्सन, मयंक अग्रवाल जेसन होल्डर, पॅट कमिंन्स यासारख्या दिग्गज खेळाडूंना आपल्या संघाने रिटेन केले नाही. आयपीएल 2023 मध्ये सर्व संघांनी मिळून एकूण 85 खेळाडूंना आपल्या संघातून सोडले आहे. दरम्यान, यावर्षी मिनी ऑक्शन मेगा ऑक्शनच्या स्वरूपात बघायला मिळले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Saamana | “महाराष्ट्राचा हिमालय! त्यांना ढोंग मान्य नव्हते पण…”, सामनाचा विशेष आग्रलेखातून बाळासाहेबांना अभिवादन
- IPL 2023 | एम एस धोनी नंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो CSK चा कर्णधार, वसीम जाफरने केले मोठे वक्तव्य
- Narayan Rane | नारायण राणे यांना झटका! कोर्टाच्या आदेशानंतर ‘अधिश’ बंगल्यावर हातोडा
- Sushma Andhare | “सुषमा अंधारे यांनी त्यांचं अंधारे अडनाव बदलून आगलावे करावं”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
- Gajanan Kirtikar | गजानन कीर्तिकरांवर काँग्रेस कार्यकर्ते संतापले, कार्यकर्त्यांचं आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

