Share

चेन्नईविरुद्ध पंजाबच्या सामन्यात चक्क तिसऱ्या पंचाना बदलावा लागला स्वत:चा निर्णय

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलमध्ये गुणतालीकेत खाते उघडले आहे. यंदाच्या सत्रातील चेन्नईचा हा पहिला विजय आहे.

या सामन्यातील दुसऱ्या डावात सलामीवीर ऋुतुराज गायकवाड लवकर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी साठी मोईन अली आला होता. मोईन अली आणि फाफ डू प्लेसीस दोघांनी विजयी भागीदारी करत चेन्नईचा विजय निश्चीत केला. दोघांच्या भागीदारी सुरु असताना रायली मेरेडिथने टाकलेल्या चौदाव्या षटकातील पाचव्या अखुड टप्प्याच्या चेंडुवर डु प्लेसीसच्या बॅट आणि ग्लोव्ह्सला लागलेला चेंडु यष्टिरक्षक के एल राहुलच्या हातात विसावला. यानंतर के एल राहुलने जोरदार अपील केले. या अपीलनंतर मैदानातील पंच अनिल चौधरी यांना खात्री नसल्यामुळे स्वेअर लेगवरील पंचाकडे चर्चा करायला गेले.

https://twitter.com/lodulalit001/status/1383109261174145025

दोन्ही पंचांनी आखेर चेंडूची उडी डू प्लेसिसच्या खांद्याच्यावर होती की नाही, हे तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी तो चेंडू योग्य असल्याचा निर्णय दिला, त्यामुळे डू प्लेसिसला बाद घोषित करण्यात आले. या निर्णयानंतर डू प्लेसिसने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली. डिआरएसमध्ये चेंडू प्लेसीसच्या बॅटला किंवा ग्लव्ह्जला लागला नसल्याची खात्री अल्ट्रा एजमध्ये झाली. त्यामुळे तिसऱ्या पंचांना त्यांचाच निर्णय बदलावा लागला आणि डू प्लेसिसला नाबाद घोषित करावे लागले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!