पंढरपूर –अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सकाळी सुरूवात झाली आहे. एकूण 524 मतदार केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 6 पूर्णांक 42 टक्के मतदान झाले, तर 3 हजार 289 मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधनानंतर विधानसभेची जागा रिक्त झाल्याने या विधानसभा मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे.वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होणार आहे.
अत्यंत चुरशीच्या या लढतीत कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यात सरळ लढत मतदारसंघात बघायला मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.
दरम्यान,पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहरातील इंग्लिश मीडियम स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली अवाताडे यांनीही मतदान केले.
महत्वाच्या बातम्या
- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, चुरशीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष
- प.बंगालमध्ये पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 853 तुकड्या तैनात
- ‘अजित पवार…तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या’
- रेमडेसिव्हिरचा काळाबाजार! घाटीतील कर्मचारी, मेडिकल चालकासह तिघे अटकेत
- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी होण्याचा भगीरथ भालकेंना विश्वास


